Ads

भद्रावती येथील पुरुषोत्तम मत्ते यांचा नागपुर येथे सत्कार

भद्रावती : धनोजे कुणबी समाज विकास महासंघ, नागपुर यांनी दि.१६ सप्टेंबर ला नागपुर येथे सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभात ज्या समाज बांधव-भगिनींनी विविध क्षेत्रांमध्ये जसे सामाजिक, राजकिय, कृषि, शिक्षण व नोकरी तसेच व्यवसायिक क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी करून समाजाची उंची वाढविली अशा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये भद्रावतीचे पुरूषोत्तम मत्ते यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. पुरूषोत्तम मत्ते हे ग्राहक पंचायत, चंद्रपुर जिल्ह्याचे अध्यक्ष, योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, भद्रावती अध्यक्ष आहेत आणि ते अनेक सामाजिक काम करतात. पण त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी आणि उत्कृष्ट कार्य हे त्यांनी त्यांच्या जन्मभूमी साठी केलेले कार्य आहे.

पुरुषोत्तम मत्ते यांची जन्मभूमी भद्रावती तालुक्यातील कोंढा हे गाव. ह्या गावावर त्यांचे प्रचंड प्रेम. ह्या प्रेमा पोटीच त्यांनी जन्मभूमी साठी केले आदर्श काम. कोंढा गावा पलीकडे एक नाला आहे. तो दरवर्षी सप्टेंबर महिण्यात कोरडा होत असे. मत्ते यांना नेहमी वाटायचे ह्या नाल्यात पाणी साठवले पाहीजे ज्यामुळे गावातील नाल्यालगतच्या शेतकऱ्यांना त्याचा नक्की फायदा होईल. म्हणुन दि. २१ एप्रिल ते २७ मे २०१९ पर्यंत भर कडक उन्हाळ्यात त्यांनी स्वत: दहा फुट खोल आणि तिस फुट रुंद असा एक किलो मिटर लांब नाल्याचे जेसिबी द्वारा खोली करण केले. खोलिकरण ह्या कामासाठी पुरूषोत्तम मत्ते यांनी स्वतः पत संस्थेतून ८ लाख कर्ज,१ लाख ५० हजार पीक कर्ज आणि शेतीचा पन्नास हजार रूपये ठेका असे एकुण पुर्ण १० लाख रुपये खर्च केले. नाल्याचे खोलिकरण केल्यानंतर नाल्याच्या खोली करणाचे फोटो त्यावेळेसचे जिल्हा अधिकारी खेमनार ह्याना दाखवून बंधारा मंजूर करण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी खेमनार यांनी अर्थ मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि त्यांचे पी.ए. विजय इंगोले ह्यांची भेट घेण्यास सांगितले. काम होईल अशी खात्री दिली. इंगोले ह्यानी जल संपदा विभाग चंद्रपुर ह्यांना लगेच दुरध्वनीवर संपर्क करून त्वरित बंधारा बजेट पाठवण्याचे कळविले. ३६ लाखाचे त्यानी बजेट पाठविले व कलेक्टर नी ३१ लाख ६ हजार रूपये मंजूर केले. ऑगस्ट २०२० मध्ये ठेकेदाराने सिमेंट बंधाऱ्याचे काम पुर्ण केले.

पुरूषोत्तम मत्ते हे सांगतात की, २०२१ च्या जुलै महिण्यामध्ये हा बंधारा तुडूंब भरलेला पाहताना माझ्या जीवनाचा उद्देश पुर्ण झाल्याने माझे मन आनंदाने उचंबळून आले. त्यांच्या या कार्यास भद्रावती करांचा सलाम. त्यांचे हे कार्य नेहमी प्रेरणादायी राहील.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment