(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- सिंदेवाही शहरात अवैध प्रकारे रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे अशी माहिती तहसीलदार गणेश जगदाळे यांना माहिती होताच
दिनांक 6 सप्टेंबर मंगळवार रात्रौ 12:30 वाजता शहरात रेती भरून असलेले ट्रॅक्टर ट्राली वाहन वाहतूक करताना दिसले असता तहसीलदार यांनी ते वाहन पकडले व तहसील कार्यालयात येथे जप्त केले आहे . अवैध प्रकारे गौण खनिज रेतीची अवैध प्रकारे वाहतूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर रेती भरलेले ट्रॉली जप्त करुन वाहन मालकावर एक लाख 17 हजार रुपयांच्या दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती तहसीलदार गणेश जगदाळे यांनी दिली आहे.
0 comments:
Post a Comment