चंद्रपूर :-चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण विभागाने 7 ऑक्टोम्बरला गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील दूध डेअरी परिसरात तब्बल 2 किलो गांजासाहित एका आरोपीला अटक केली.Crime investigation department of Ramnagar police station seized 2 kg ganja
चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरात राहणारा आरोपी
30 वर्षीय सुजन जितेंन मालो हा 7 ऑक्टोम्बरला जुनी वापरती बजाज मोटर सायकल क्रमांक mh33978 ने अवैधरित्या गांजा बाळगून दूध डेअरी मार्गाने जाणार असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे डीबी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी दूध डेअरी मार्गावर नाकाबंदी केली असता एक इसम त्यांना संशयास्पद आढळून आला. Narcotics त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्या वाहनात एक थैली आढळून आली, त्यामध्ये 2 किलो 300 ग्राम गांजा वनस्पती मिळून आली.
सदर मालाची किंमत 20 हजार 300 रुपये असल्याची माहिती प्राप्त झाली. Chandrapur crime news आरोपी सुजन हा मागील 1 वर्षापासून चंद्रपुरात राहत नव्हता तो गडचिरोली जिल्ह्यात गेला होता. अचानक वर्षभरानंतर तो चंद्रपूर जिल्ह्यात गांजा घेऊन दाखल झाला होता, गांजाचे सॅम्पल
दाखविन्यासाठी आरोपी सुजन चंद्रपुरात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी नागरिकांना विनंतीपूर्व आवाहन केले की शहरात कुठेही अंमली पदार्थ विक्री, खरेदी होत असेल तर पोलिसांना याबाबत माहिती द्या. आम्ही अंमली पदार्थविरोधात अभियान राबवून ही घाण साफ करू.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनी विनोद भुरले, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, किशोर वैरागडे, सतीश अवधरे, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता यांनी यशस्वीपणे पार पाडली.
0 comments:
Post a Comment