Ads

शेतातील उभे पिकाची नासधूस करून आत्महत्या करण्यास प्रवृत करणाऱ्या वनाधिकारी वर फौजदारी गुन्हा करा- डॉ. राकेश गावतुरे

चंद्रपूर : जिल्ह्यात वनविभागातर्फे शेतकऱ्याच्या उभ्या पिकाची नासधूस करण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून पीडित शेतकऱ्याने उपासमारीची पाळी येणार म्हणून शेतातच विष प्राशन केले होते. Chandrapur forest
Make a criminal case against the forest officer who destroyed the standing crops of the farmers and encouraged them to commit suicide - Dr. Rakesh Gavture
गोंडपीपरी तालुक्यातील गोजोली येथील शेतकरी गणपती गंगाराम सोनूले यांचं शेत आहे, मात्र त्या परिसरातील तब्बल 58 हेक्टर जमीन दालमिया सिमेंट कंपनीला देण्यात आली असून वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांची जमीन खाली करण्याची मोहीम वनविभागाने सुरू केली आहे. Dalmia cement company शेतकरी सोनूले हे वडिलोपार्जित शेती करीत आहे, चालू हंगामात त्यांनी तब्बल 2 लाख रुपये खर्च करीत पराटी लावली होती, 1 ऑक्टोम्बरला वनविभागाचे वनरक्षक सौ. मडावी, वनमजूर मधुकर गेडाम यांनी शेतात येऊन उभी असलेली पराटी चे पिके उध्वस्त केली. त्यामुळे आता आपल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल या चिंतेत सोनूले यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला लोकांच्या मदतीने त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या घटनेविरोधात भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेचे डॉ. राकेश गावतुरे सहित राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांनी पोलीस स्टेशन गाठत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

सोनूले यांच्या शेतातील अतिक्रमनाबाबत वनहक्क दावा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित आहे. मात्र सोनूले यांनी शेतात राबत जे पीक उभे केले, ते पीक क्षणार्धात उध्वस्त केले.

त्या वनकर्मचाऱ्यांवर कारवाई करीत त्यांना निलंबित करावे अशी मागणी भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेच्या वतीने डॉ. राकेश गावतुरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.

याबाबत गोजोली ग्रामपंचायत चे ग्राम सेवक देवानंद गेडाम यांचेशी सम्पर्क साधला असता त्यांनी सांगितले की दालमिया सिमेंट कंपनीला वनविभागाच्या अतिक्रमित जागेवर असलेले अतिक्रमण काढावे असा ठराव ही झाला आहे. लवकरच 58 हेक्टर जमिनीवर दालमिया सिमेंट कम्पनी उत्खननाचे काम सुरू करणार असल्याची माहिती दिली.

मात्र वर्षभर शेतात राबत शेतकऱ्यांचे उभे पीक वनविभागाचे कर्मचारी करीत असतील तर हा शेतकऱ्यांवर करण्यात आलेली हिटलरशाही म्हणावी लागेल.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment