ब्रम्हपुरी :-हळदा येथील घटना ताजी असतानाच सदाशिव रावजी उंदिरवाडे (६५) या शेतकऱ्याला वाघाने ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी कुडेसावली येथील शेतशिवारात घडली. उंदिरवाडे
सकाळी आपल्या शेतात काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली.
या घटनेची माहिती वनविभागाला दिली असता आवळगांवचे वनक्षेत्रसहाय्यक ए. पी. करंडे आपल्या कर्मचा-यासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर मेडकी पोलीसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी येथे पाठवला. एक दिवसाअगोदर हळदा येथील महिलेला वाघाने ठार केले होते. या सततच्या घटनांनी नागरिक घाबरले
आहेत.
0 comments:
Post a Comment