Ads

कर्तव्य बजावतांना लाइनमैन चा अपघाती मृत्यु

पोंभूर्णा: तालुक्यातील चेक तीबोडी येथे दिनांक 22 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी प्रकाशमय व्हावी व शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा व्हावा यासाठी महावितरण पोंभूर्णा चे कर्मचारी श्री. दिपक पेंदाम (वय 30) यांचा 11kv विद्युत वाहीनीच्या दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक अपघात झाला आणि त्यामध्ये श्री. दिपक पेंदाम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.Accidental death of lineman in line of duty
सविस्तर वृत्त असे की, श्री. दिपक बाळ पेंदाम रा. खेडी, ता. सावली येथील असून ते महावितरण पोंभूर्णा येथे मागील दीड वर्षापासून कर्तव्य बजावत होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि प्रामाणिक कर्तव्यनिष्ठेमुळे ते जनतेच्या गळ्यातील ताईत झाले होते. त्यांच्या कामाबाबत उपस्थित जनसमुदायातून "असा लाईनमन पुन्हा होणे नाही" असा एकच सुर उमटत होता. त्यामुळेच त्यांना विभागीय कार्यालय यांचेकडून "उत्कृष्ट कामगार" या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले होते हे विशेष. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

पुढील चौकशी पोंभूर्णा उप-पोलिस स्टेशन चे ठाणेदार श्री. धर्मेंद्र जोशी करीत आहे. सदर घटनेबाबत मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी तात्काळ महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनी तसेच पत्राद्वारे संपर्क करून सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व मृतकाच्या परिवारास शासकीय नियमाप्रमाणे तात्काळ मदत देण्याचे निर्देश दिले. घटनेचे वृत कळताच भारतीय जनता पार्टी, पोंभूर्णा चे पदाधिकारी लगेच घटनास्थळी दाखल झाले यावेळी कु. अल्का आत्राम जिल्हाध्यक्षा महिला आघाडी, अजित मंगळगिरीवार उप नगराधक्ष न.पं. पोंभूर्णा, बंडू बुरांडे, वैभव पिंपळशेंडे, विनोद मारशेट्टीवार, दर्शन गोरंटीवार इत्यादी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment