चंद्रपुर :-जुन्या पिढीतिल ज्येष्ठ नाट्य कलावंत , भारतीय शिक्षण संस्था नवरगावचे उपाध्यक्ष श्री परमानंद पाटील बोरकर यांच्या निधनाने अष्टपैलु कलावंत , तत्वनिष्ठ संघ स्वयंसेवक असे बहुआयामी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड़ गेल्याची शोकभावना चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
With the passing away of Mr. Parmanand Patil Borkar,a versatile artist,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक म्हणून त्यांनी नवरगाव परिसरात निष्ठेने संघकार्य केले. नाट्य कलावंत म्हणून दीर्घकाळ त्यांनी रंगभूमीची सेवा केली . श्री व्यंकटेश नाट्य मंडळ नवरगावचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी अनेक वर्षे कार्य केले. भारतीय शिक्षण संस्था नवरगावच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात देखील मोलाची कामगिरी केली. कै बालाजी पाटील बोरकर यांच्या दिव्य संस्कारातून घडलेल्या त्यांचे व्यक्तिमत्व अनेकांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी होते. त्यांच्या निधनाने कला , सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
0 comments:
Post a Comment