चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्गुस येथील अमराई वॉर्डांत भूस्खलनLandslide झाल्याने एका नागरिकाचे घर जमिनीत गेले.या परिसरातील अन्य घरांना अशा प्रकारचा धोका होऊ शकतो. त्यामुळे ६७५०० वर्गमिटर मधील घरांना धोकादायक भाग म्हणून जाहीर करण्यात आले. यामध्ये १६०घरे अतीधोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे. स्थायी स्वरूपात निवाऱ्याची व्यवस्था होईस्तव त्यांना राहण्याकरिता ३००० हजार रुपये घरभाडे वेकोलि देण्याची विनंती खासदार बाळू धानोरकर यांनी केली होती. त्यांची दखल घेत १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सहा महिन्याचे घरभाडे २८ लक्ष ८० हजार रुपये मुख्य अधिकारी नगरपरिषद घुग्गुस यांच्याकडे वळते केले आहे. खासदार बाळू धानोरकर यांचे सर्वत्र आभार मनात आहे.
घुग्गुस येथील अमराई वार्डात राहणार्या श्री. गजानन मडावी यांचे राहते घर अचानक पणे भूस्खलन होऊन जमिनीखाली गाडल्या गेले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच तातडीने याठिकाणी भेट देऊन खासदार बाळू धानोरकर यांनी पाहणी केली होती. यासंदर्भात वेकोलीचे महाप्रबंधक अभाशचंद्र सिंग व तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्याशी बैठक वेकोलिच्या विश्रामगृहात घेतली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी खासदार बाळू धानोरकर यांना बाधित जागेच्या नकाशा दाखवून पर्यायी व्यवस्थांबाबत चर्चा केली होती. सन १९०२ ते सन १९४० पर्यंत या भागामध्ये इंग्रजकालीन भूमिगत कोळसा खाण होती. व १९५० ते १९८४ पर्यंत देखील भूमिगत खान होती. त्यानंतर या ठिकाणी खुली खदान सुरु झाली. पूर्वीच्या अंडरग्राउंडच्या दोन गॅलरी जंक्शन मध्ये हा भाग खचला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्याची गरज आहे. पुढे देखील त्यांच्या हक्कासाठी सोबत राहण्याचे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांनी दिले.
0 comments:
Post a Comment