55-year-old Men was killed for not giving a bike to take sick child at the hospital
दिनांक २४/१०/२०२२ रोजी भद्रावती पोलीस स्टेशन हददीताल मौजा कोंडेगाव येथे आरोपी यांनी मुलाला दवाखाण्यात नेण्यासाठी मोटार सायकल मागीतली असता मृतक नामे घनश्याम सहारे यांनी आपली मोटार सायकल देण्यास नकार दिल्याच्या वादावरूण झालेल्या भांडणातून आरोपी तुकाराम नारायण भोयर रा. कोंडेगाव यांनी मृतक नामे घनश्याम सहारे व त्याचा मुलगा नामे शक्ती घनश्याम सहारे (24)यांना चाकूने मारून जखमी केल्याने घनश्याम सहारे जागीच ठार झाला तर मुलगा जखमी असल्याची माहीती प्राप्त होताच पोनि गोपाल भारती सा. पोस्टॉफ सह घटनास्थळी तात्काळ पोहचले व आरोपीस ताब्यात घेउन वरीष्ठांना माहीती दिली. घनश्याम सहारे यांचा मृत्यु झाल्याने भद्रावती येथे अप क्र. ५१४ / २०२२ कलम ३०२, ३०७,५०४, ५०६ भादवी चा गुन्हा नोंद असून याप्रकरणी आरोपी तुकाराम नारायण भोयर (५५) याला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटनास्थळी मा. पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी सा. उप वि. पोलीस अधिकारी आयुश नोपानी सा. यांनी भेट देउन तपासासंबधाने मार्गदर्शन केले. मेडीकल कॉलेज नागपूर येथे मृताच्या उपचार सुरू असून सदर गुन्हयाचा तपास पोउपनि अमोल तुळजेवार पोलीस स्टेशन भद्रावती हे करत आहेत.
0 comments:
Post a Comment