माजरी : माजरी येथील नागरी वस्तीत वाघाने घुसखोरी करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच (२४ ऑक्टोबर) एकाचा बळी घेतला. दिपू सियाराम सिंग महतो (३०) असे वाघाच्या हल्ल्यात ठार Killed in a tiger attack झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिपू सिंग महतो हा खासगी कंपनीमध्ये कार्यरत होता. रात्रपाळी असल्याने तो न्यू हाऊसिंग कॉलनी येथील घरून कंपनीत कामावर जात होता. याचवेळी एका घरामागे दबा धरून बसलेल्या वाघाने दिपूवर हल्ला चढविला. वाघाने त्याला फरफटत झुडपात नेत त्याच्या नरडीचा घोट घेतला. या हल्ल्यात दिपू जागीच ठार झाला.Tiger incursion into Majri civilian settlement
दिपूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
शोधाशोध केली असता नाल्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.
मागील काही दिवसांपासून हल्लेखोर वाघ वेकोली क्षेत्र व नागरी वस्तीत अनेकांना दिसला आहे. मात्र,वनविभाग व वेकोली प्रशासन अनुचित घटना घडण्याची वाटबघत होते. ज्या रस्त्यावरून दिपू कामाला जात होता, त्या रस्त्यावर ग्रामपंचायतनेसाधे पथदिवेसुद्धा लावलेले नाहीत.
आतातरी वनविभाग, वेकोली शासन वग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना करीत वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
0 comments:
Post a Comment