मुंबई :एकनाथ शिंदे गटाचा शिवसेना दसरा मेळावा मुबंई येथे सुरू आहे. यावेळी शिंदे गटातील सर्व अपक्ष आमदारांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला.MLA Kishore Jorgewar felicitated Chief Minister Eknath Shinde on behalf of all independent MLAs at Shiv Sena's Dussehra gathering
आमदार किशोर जोरगेवार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील मित्रत्व आता लपून राहिलेले नाही. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री 2 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांना भेटण्यासाठी मुबंई येथील निवासस्थानी बोलावून घेतले होते. नंतर गणपती उत्सवा दरम्यानही मुख्यमंत्री यांच्या आमंत्रणा नंतर आमदार किशोर जोरगेवार सहकुटुंब मुख्यमंत्री यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. दरम्यान आज मुंबई येथे शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहे. या मेळाव्यात स्वागत समारंभ कार्यक्रम सुरू असतांना सर्व अपक्ष आमदारांच्या वतीने मुख्यमंत्री यांचा सत्कार करण्याची संधी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना देण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही जवळीक चंद्रपूच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
0 comments:
Post a Comment