चंद्रपूर: द एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी द्वारे संचालि इंदिरा गांधी गार्डन स्कूलमध्ये नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. नवमीच्या पवित्र दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रास गरब्याचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका बावनी जयकुमार यांनी दीपप्रज्वलन करून माता राणीची विधिवत पूजा केली. सुरुवातीला 'दुर्गस्तवन' सादर करून विद्यार्थ्यांनी आपल्या सुरेल आवाजाने उपस्थित दर्शकांना मंत्रमुग्ध केले.
विजयादशमीच्या निमित्ताने पूर्व प्राथमिक वर्गातील मुलांनी यावेळी असत्यावर सत्याचा विजय दर्शविणारे सुंदर नाटक सादर केले. रामाचा वनवास, सीतेचे हरण , वानर सेनेचा प्रवास, रावण वध या घटना नाटकात अप्रतिमपणे मांडण्यात आल्या आहेत. छोट्या कलाकारांनी सादर केलेल्या उकृष्ट अभिनयाने पालक व शिक्षकांची मने जिंकली. हे नाटक संपूर्ण कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. या नंतर शाळेतील इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी महिषासुर वध व गरबा या विषयावर सुंदर नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या कॅबिनेट सदस्यांनी केले. यानंतर नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी रास गरबा कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक बावनी जयकुमार यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
0 comments:
Post a Comment