Ads

भद्रावती येथे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी निमित्त दोन दिवसीय कार्यक्रम

भद्रावती(जावेद शेख) : श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती भद्रावतीच्या वतीने १० व ११ ऑक्टोबर या दोन दिवस श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.A two day program on the death anniversary of Shri Sant Nagaji Maharaj at Bhadravati

स्थानिक श्री संत नगाजी महाराज देवस्थान मंजुषा ले आऊट गवराळा वार्ड येथे होणाऱ्या या पुण्यतिथी निमित्त विविध आध्यात्मिक,सामाजीक, शैक्षणिक,व प्रभोदनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात दि. १० रोज सोमवारला सकाळी ७ ते १० वा. श्री ची घटस्थापना, पूजा व आरती श्री वामनराव चौधरी, श्री बापुराव जुनारकर, श्री मुर्लिधराव मेश्राम, श्री भाऊरावजी दैवलकर व श्री रमेशराव खातखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १ ते ५ वाजता महिला व मुलिकरिता स्पर्धा, महिला संमेलन व आनंद मेळावा, सायं- ६.३० ते ७ सामुदायिक प्रार्थना व विचार मंथन, सायं - ७ ते ८ पोथीचे पारायण लक्ष्मणराव चौधरी यांच्या हस्ते. रात्री- ८ ते १० भजन ओम शिवशक्ती महिला भजन मंडळ नगाजी नगर भद्रावती, दि. ११ रोज मंगळवारला सकाळी ६ ते ७ वाजता सामुदायिक ध्यान, सकाळी ७ ते ८श्री चा अभिषेक, पुजा व आरती सकाळी- ५ ते ११ वाजता पालखी सोहळा व शोभायात्रा - नगाजी महाराज मंदिर ते नगाजी नगर परिसरात या शोभायात्रेत विश्वकर्मा महिला भजन मंडळ हनुमान नगर, ओम शिवशक्ती महिला भजन मंडळ, शारदा माता महिला भजन मंडळ नगाजी नगर भद्रावती. यांचा समावेश असणार आहे. दुपारी- ११ ते २ वा. जाहीर किर्तन व गोपाल काला ह. भ. प. अशोक महाराज सुर्यवंशी तळेगावकर, जि. वर्धा साथसंगत श्री गजानन क्षिरसागर आणि संच भद्रावती. दुपारी - २ ते ४ गुणवत्ता विध्यार्थी व कोरोना योध्दांचा सत्कार समारंभ,
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी - मा. श्री रविंद्रजी नलगंटिवार व्यवस्थापकीय अधिक्षक संधिनिकेतन आनंदवन वरोरा, प्रमुख पाहुणे- मा. आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर,मा.नगराध्यक्ष अनीलभाऊ धानोरकर, मा. संततोषभाऊ आमने उपाध्यक्ष नगरपरिषद भद्रावती, मा. प्रफुल्ल भाऊ चटकी माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक नगरपरिषद भद्रावती. सत्कार मुर्ती - मा. डॉ अभय नक्षिणे प्रधान चिकित्सक अधिकारी ओ. एफ. सी. चांदा भद्रावती, मा डॉ. रीतेश वाटेकर प्रा. आरोग्य अधिकारी चंदणखेडा, मा. सुशांत नक्षिणे पॅथाट्रिना हेल्थ केअर प्रा. ली
मॅनेजिंग डायरेक्टर चंद्रपूर, मा. श्री. विजयराव नागपूरकर पो. ह. भद्रावती, मा. श्री प्रशांत लाखे रुग्णवाहिका पायलट भद्रावती, मा. सौ. प्रियंका चौधरी ए. एन. एम. परिचारिका भद्रावती, मा. सौ. स्वाती दैवलकर आशा स्वयंसेविका भद्रावती, सायंकाळी - ५ ते ९ महाप्रसाद, सायं. ६ ते ९ भजनसंध्या भक्ती गित या कार्यक्रमाकरीता दि. ११ ऑक्टोबर रोज मंगळवारला एक दिवसिय रजा घेऊन सर्व कर्मचारी व सलुन दुकानदारांनी आपआपलि दुकाने बंद ठेवुन या कार्यक्रमात उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन श्री. बंडु व्ही लांडगे अध्यक्ष, श्री रवींद्र हणुमंते कार्याध्यक्ष, श्री सचिन नक्षिणे सचिव, श्री हरीश घुमे उपाध्यक्ष, श्री शंकर हणुमंते कोषागार, श्री सुरेश जमदाडे सहसचिव, सदस्य श्री पांडुरंग हणुमंते, श्री सतिश मांडवकर, श्री सुधीर लांडगे यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment