Ads

*शासकीय रुग्णालय मध्ये सुरू असलेला भोंगळ कारभार तात्काळ बंद करा. आम आदमी पार्टी चंद्रपूर

चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये मागील काही दिवसात अनेक रुग्णांना उपचार अभावी आपले प्राण गमवावे लागले तसेच तिथे रुग्णांची गैरसोय होत असल्यामुळे अनेक तक्रारी आम आदमी पार्टीकडे येत आहेत अशातच चार दिवसाआधी बाबूपेठ मधील टॉवर टेकडी येथील शिवकुमार बेताल या 21 वर्षीय तरुणाला सोनोग्राफीची मशीन बंद असल्याने उपचारा अभावी प्राण गमवावे लागले.
Stop the mismanagement in the government hospital immediately. Aam Aadmi Party Chandrapur
हा संपूर्ण प्रकार आम आदमी पार्टीच्या पुढाकाराने समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात रोष व्यक्त केल्या जात आहे. जिल्हा रुग्णालय मधील होत असलेला गैरप्रकार रोखण्याकरिता आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळातर्फे चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे डीन यांना जिल्हा रुग्णालय मधील होत असलेला गैरप्रकार निदर्शनास आणून दिला आणि सात दिवसाच्या आत औषधी, डॉक्टरांची कमतरता, मशीन ची व्यवस्था पूर्ण करावी. अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे पालकमंत्री यांचा घरासमोर भिक मागो आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.
सदर कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे, शहर सचिव राजू कूड़े, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, बल्लारपूर शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार, संघटन मंत्री प्राध्यापक गांडलेवार, झोन अध्यक्ष सुनिल सदभय्या, झोन अध्यक्ष रहमान खान, सपना मेश्राम, सुनिता गुजर, बाबरे ताई, सागर भाई, भीमराज बगेसर, अजय कुमार बाथव इत्यादि उपस्थित होते.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment