चंद्रपूर :- राज्यातील 19 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.
त्या मध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची बदली झाली आहे. नागपूर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त पदी त्याची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विनय गौडा हे चंद्रपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) असलेले विनय गौडा यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2 वर्षाहून अधिक काळ काम केले आहे. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. करोना, अतिवृष्टी या संकटात जिल्हा परिषदेने उत्कृष्ट काम केल्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले होते. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्याने दि. 21 मार्चपासून जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून ते काम पाहतहोते. प्रशासनातील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवत जिल्ह्यात आवश्यकतेनुसार कामांना प्राधान्य त्यांनी दिले. त्या आधी ते तळोदा येथे प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी म्हणून दिड वर्ष काम पाहिले होते. गौडा यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घरकुल योजनेवर भर दिला होता. योजना प्रभावीपणे राबविणारी नंदुरबार जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली होती.
0 comments:
Post a Comment