Ads

शेतात भीतीने दडून बसलेले निलगायीचे पिल्लू वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सुपूर्त

भद्रावती (जावेद शेख):
भद्रावती तालुक्यातील चपराडा येथील प्रतिष्ठित नागरिक गोपाल बोंडे यांच्या शेतात भीतीने दडून बसलेले निलगायीचे पिल्लू सोमवारी सायंकाळी भद्रावतीच्या वनपरिक्षेत्र
अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
A nilgai cub hiding in the field was handed over to the forest range officials
रविवारी सायंकाळी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी निलगायीचे Nilgai भेदरलेले पिल्लू गोपाल बोंडे यांच्या शेतात येवून बसले असावे. सोमवारी दुपारपर्यंत चपराडा येथे रिपरिप पाऊस सुरू होता. यावेळी
गोपाल बोंडे हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यांना निलगायीचे हे पिल्लू शेतात
भितीने दडी मारून बसलेले दिसले. लगेच याची सुचना वनविभागाला देण्यात आली.

निलगायीच्या पिल्लाला बघण्यासाठी
गावकऱ्यांची तोबा गर्दी जमली. काही वेळातच निलगायीच्या पिल्लाला भद्रावतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे यांना सुपूर्त करण्यात आले.

चपराडा येथील गोपाल बोंडे हे शेतकरी संरक्षण समिती तालुका भद्रावतीचे अध्यक्ष तसेच भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास (अन्ना हजारे प्रणित) तालुका शाखा भद्रावतीचे अध्यक्ष आहेत. यावेळी चपराडा येथील विलास आगलावे, कुणाल नागपुरे, रमेश आगलावे, सुरेश पोतराजे, मनोज आवारी, वामन पोतराजे तसेच गावातील नागरिकांनी सहकार्य केले.

यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास (अण्णा हजारे प्रणित) जिल्हा कार्यकारी अध्यक्ष तथा शेतकरी संरक्षण समिती जिल्हा चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल बदखल प्रामुख्याने उपस्थित होते. निलगायीचे पिल्लू वनविभागाच्या स्वाधीन करून भुतदयेचे अनोखे उदाहरण समोर ठेवल्यामुळे गोपाल बोंडे यांचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment