तालुका प्रतिनिधी (भद्रावती):- विवेकानंद स्पोर्टिंग क्लब व विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंद स्पोर्टिंग क्लब ला 25 वर्षे पूर्ण होत असल्याने रोप्य महोत्सवरूपी महाराष्ट्र वॉलीबॉल संघटना यांच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्यस्तरीय सब ज्युनिअर गट आंतर विभागीय वॉलीबॉल स्पर्धा मुले व मुलींच्या 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान विवेकानंद महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर दिवस-रात्र आयोजित करण्यात आले आहे.
या स्पर्धेकरिता विद्युत प्रकाश झोतातील दोन मैदाने सज्ज असून स्पर्धा ही दिवस-रात्र सत्रात खेळविले जाणार आहे .या विएससी चषक स्पर्धेतून महाराष्ट्र संघ निवडला जाणार आहे. निवड झालेला संघ पुढील राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धे करता भद्रावतीतूनच रवाना होईल असे माहिती आयोजकांनी दिली आहे .या वि एस सी चषक स्पर्धे करिता आठ विभागातील कोल्हापूर विभाग ,नाशिक, पुणे ,मुंबई ,औरंगाबाद, लातूर, अमरावती विभाग व यजमान नागपूर विभाग यांचे मुला मुलींचे संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेकरिता 250 खेळाडू सहित पदाधिकारी पंच सहभागी होत आहे. महाराष्ट्र वॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील व सचिव विरल शहा यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा यशस्वी करण्याकरिता विवेकानंद स्पोर्टिंग क्लब व विवेकानंद महाविद्यालय भद्रावती चे राजेश मते, रवींन तेलतुंबडे, दिनेश गोडे, समीर बलकी, आदर्श आशुटकर, प्राचार्य नामदेव उमाटे आदी परिश्रम घेत आहे. सोबतच या स्पर्धेचा एक भाग म्हणून सहा नोव्हेंबरला नागपूर विभागीय संघाची निवड चाचणी सुद्धा विवेकानंद महाविद्यालय स्पोर्टिंग क्लब च्या वतीने घेऊन नागपूर विभागीय मुले व मुलींच्या संघाची निवड करण्यात आली आहे
. वॉलीबॉल स्पर्धा
0 comments:
Post a Comment