चंद्रपूर : शहरासह देशातील पर्यावरण, निसर्ग, प्रदूषण आणि वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना आणि व्यापक धोरण आखण्याची गरज असून, यावर इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांचेसोबत भारत जोडो पदयात्रेत सहभाग घेत सविस्तर चर्चा केली.
राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात असून, हिंगोली ते मालेगाव जहागीर (वाशिम) पदयात्रेदरम्यान अध्यक्ष बंडू धोतरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सहभाग घेतला. तीन दिवस पदयात्रेत सहभागी होत देशभरातून सहभागी झालेल्या भारत यात्रीसोबत चर्चा केली.
पदयात्रेच्या माध्यमाने देशभरातील नागरिकांना प्रत्यक्ष जोडून घेत, विविध भागातील समस्या, प्रश्न आणि नागरिकांची विचार समजून घेण्याच्या दॄष्टिने, तसेच देशातील विविधता आणि एकता, बंधुभाव कायम राहावा या दॄष्टिने ही पदयात्रा महत्वाची आहे. देशातील विविध भागातील समस्या, त्याची तीव्रता, नागरिकांची भूमिका याविषयी जाणून घेता येणार आहे. यात पर्यावरण विषयक मुद्दे सुद्धा विचारात घ्यावे, अशी विनंती यावेळी बंडू धोतरे यांनी केली. बंडू धोतरे यांच्यासह इको-प्रोचे सहकारी संदीप जीवने, अब्दुल जावेद व देवनाथ गंडाटे सहभागी झाले होते.
या दरम्यान तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेदरम्यान सोबत चालण्याची संधी मिळाली. सोबत चालताना चंद्रपूर शहरातील तसेच देशातील प्रदूषण, पर्यावरण, वन्यजीव संवर्धन, त्याचे अधिवास-कॉरिडोर आणि घटते वनक्षेत्र, अधिवास आणि वाढत असलेला मानव-वन्यप्राणी संघर्ष समस्या संदर्भात चर्चा केली. देशातील अनेक शहरे प्रदूषित होत असून, वायु प्रदूषण, नदी-तलाव जलप्रदूषण यासंदर्भात भविष्यातील धोका टाळण्यासाठी व्यापक उपायोजना, नियोजन करीत आपल्या सभोवताल असलेले 'जल-जंगल-जमीन''Water-Forest-Land' bio जैव-विविधता विषयक मुद्दे महत्वाचे असून, विकास साधताना "पर्यावरण व मानव" "Environment and Man" यांचा विचार सुद्धा केला जाणे तितकेच गरजेचे आहे. यादरम्यान त्यांनी विविध विषयांवरील सविस्तर निवेदन राहुल गांधी यांना दिले. महात्मा गांधीच्या तत्त्वावर चालणाऱ्या आणि सामाजिक चळवळ उभी करणाऱ्या विदर्भातील सात सामाजिक कार्यकर्त्यांवर "बीइंग द चेंज" हे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाची प्रत धोतरे यांनी राहुल गांधी यांना भेट म्हणून दिली.
0 comments:
Post a Comment