चंद्रपुर : मागील काही दिवसापासुन चंद्रपुर शहरात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने अशा गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. या निर्देशानुसार पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे स्थागुशा चंद्रपुर यांनी एक विशेष पथक नेमुन त्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक दिवसापासुन सापळा रचला. दि. 17/11/22 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोस्टे रामनगर रेकॉर्डवरील घरफोडीचा गुन्हेगार नामे धमेन्द्र खोब्रागडे रा. अष्टभुजा वॉर्ड, रमाबाई नगर चंद्रपुर सिस्टर कॉलनी येथे सास-याकडे राहत असुन त्यांचे घरी घरफोडीतील चोरीस गेलेले फ्रिज, गॅस सिलेडेंद व ईतर साहित्य लपवुन ठेवले आहे अशी खात्रीशीर खबर मिळाल्याने सदर ईसमाचे घराची झडती घेतली असता त्याचे घरात रूममध्ये फ्रिज, गॅस सिलेडंर व ईतर साहित्य व गुन्हयात वापरलेली बजाज पल्सर 220 बिना कंमाकांची मोटार सायकल असा एकुण 1,05,500 /- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
1,55,500/- from two criminals on record for burglary.
सदर आरोपीने त्याचे साथीदार योगेश सोनवाने रा. रमाबाई नगर चंद्रपुर यांनी अंदा. एक महिन्यागोदर कोसारा रोडवरिल जोरा हवेलीच्या मागे बंद घराचा ताला तोडुन सदरची चोरी केली आहे त्याचेकडुन पोस्टें रामनगर येथे दाखल असलेला अप. के 1075 / 22 कलम 454, 457, 380 भादवीचा गुन्हा उघडकीस आला
या गुन्हया व्यतीरिक्त नमुद गुन्हेगाराची पडोली हदिदतुन टक, टॅकर, ट्रॅक्टर चे बॅट-या चोरी केली असल्याचे सांगितल्याने त्यांचेकडुन विविध कंपनीच्या बॅट-या एकुन 10 नग कि. 50,000 / - रुचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला त्याचेकडुन पोस्टे पडोली येथे दाखल असलेला अप. कं 175 / 22 कलम 379 भादवीचा गुन्हा उघडकीस आला
नमुद दोन्ही अटटल घरफोडी करणारे गुन्हेगाराकडुन घरफोडीचे साहित्य व चोरी केलेले बॅट-या एकुन 1,55,500 रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगीरी मा. श्री. रविंद्रसिंग परदेशी पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पो. नि. बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा, सपोनी संदिप कापडे, पो.हवा. संजय आतकुलवार, पो.अ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरी, प्रांजल झिलपे, नरेश डाहुले, म.पो.शि. अपर्णा मानकर यांनी केली.
0 comments:
Post a Comment