Ads

किन्ही गावात पार पडला कुत्रीच्या पिल्याचा नामकरण विधी....

ब्रह्मपुरी(प्रशांत गेडाम):
ब्रह्मपुरी तालुक्यातील किन्ही गावात चक्क कुत्र्यींच्या पिल्लूचा नामकरण विधीचा कार्यक्रम १६ नोव्हेंबर २०२२ रोजी बुधवारी सायंकाळी
५ वाजता स्थानिक हनुमान लहान देवस्थान समोर हिंदूसंस्कृतीनुसार बहुसंख्य महिला व पुरुष मंडळीच्या उपस्थितीत संपन्न झाला व सदर पिल्लूचे नाव दत्तात्रय ठेवण्यात आले त्याचे पालन पोषणाची जबाबदारी अनुसया यादव सहारे यांनी घेतली आहे
A puppy naming ceremony was held in kinhe villages.
विशेष म्हणजे गेल्या पाच सहा वर्षांपासून अनुसया नावाची कुत्री गावातील मोहल्यातील दहा पंधरा कुटुंबातील पीठ भाकरी शिळे अन्न खाऊन राहायची.. तिचा शांत स्वभाव मोहल्ला वासियांना चांगलाच भाळला. त्यामुळे ती सर्वांची लाडकी झाली होती.. मात्र गेल्या काही दिवसां अगोदर तिच्या पोटी पिल्लू जन्माला आले मग काय? मोहल्यातील व किन्ही गावातील रहिवासी असलेले रवींद्र प्रधान यांनी स्वतः स्वखर्चातून व मनोज सहारे यांच्या पुढाकारातून पिल्लू चा नामकरण विधीचा कार्यक्रम करण्याचे ठरवले त्यानंतर हिंदू संस्कृतीनुसार विद्यीवत पद्धतीने पिल्लू चे नामकरण संपन्न झाले त्यामध्ये पिल्लूचे नाव दत्तात्रय ठेवण्यात आले
हा नामकरण विधीचा कार्यक्रम पाहण्यासाठी बऱ्याच लोकांची उपस्थिती होती.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनुसया यादव सहारे, रंजना रवींद्र प्रधान, विमल जनार्दन धोटे, शेवंता लक्ष्मण सदाफळे, विमल मनचंद्र भागडकर, पार्वता टोलीराम भरै, साधना मनोज सहारे, रवींद्र प्रधान,यादव सहारे किसन राऊत, भगवान बगमारे, सुधाकर भर्रे, मनोज सहारे दिनेश दोनाडकर. यांनी मोलाचे सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment