चंद्रपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ( ग्रामीण) राजेंद्र वैद्य यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या धक्क्यातून अद्याप कार्यकर्ते सावरलेले नसताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा बेबीताई उयके यांनी प्रदेशाध्यक्षाकडे राजीनामा पाठविला आहे. या दोन धक्क्यांनी कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत तर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीच्या बेबीताई उईके या सर्व सामान्य कुटंबातील आहेत. कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली. स्वतःला पक्षासाठी झोकून दिलं. सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी हिरहिरीने प्रशासनासमोर मांडले आहेत. त्यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनं पार पडलीत. त्यांच्या प्रामाणिक कार्याचे शरद पवार यांनी कोतुकही केलं आहे. परंतु, आज त्यांनी अचानक राजीनामा दिला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठविला आहे. राजीनामा देण्यामागे त्यांनी वैयक्तिक कारण सांगितलं आहे. राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडणार नाही असही उसके म्हणाल्या. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) राजेंद्र वैद्य यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असतानाच वैद्य यांचे राजीनामा नाट्य घडले. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्तेही अस्वस्थ झाले आहे.
0 comments:
Post a Comment