(प्रशांत गेडाम)सिंदेवाही -आज सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर ला पोलीस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा मरेगाव येथे, भेट देऊन, बालक दिन साजरा करण्यात आला, त्यांच्या बालक दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन सिंदेवाही तर्फे पोलीस सारथी मोहिमे अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेChildren's Day was celebrated enthusiastically by the Sindewahi Police in Ashram School in Maregaon.
. त्यामध्ये गुड टच, बॅट टच, लैंगिक अत्याचार, शोषण, तसेच तंबाखू गुटखा असे मादक पदार्थ सेवन न करणे अशा सूचनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व भेटवस्तू देऊन बालक दिन साजरा करण्यात आला. पोलीस काका व पोलीस दीदी यांचे सोबत बालदिन साजरा झाल्यामुळे सर्व बालकांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद रंगारी अधीक्षक शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा मरेगाव, तसेच इतर शिक्षक वृंद हजर होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सपोनी योगेश घारे, ठाणेदार पोलीस स्टेशन सिंदेवाही, रणधीर मदारे, मंगेश मातेरे, रूपा राऊत हे उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment