Ads

फेअरीलैंड शाळेत बालकदिन विवीध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

भद्रावती तालुका प्रतिनिधी:
स्थानीक फेअरीलैंड शाळेत दिनांक १४रोज सोमवारला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालकदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Children's Day was celebrated with enthusiasm in Ferryland School with various programs
याप्रसंगी शाळेत विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अड.युवराज धानोरकर, मुख्याध्यापीका वर्षा धानोरकर, ऊपमुख्याध्यापीका अर्चना धोटे,अधिक्षक कुमुद पोईनकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून,दीपप्रज्वलन करून व पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अॅड.युवराज धानोरकर यांनी आपल्या भाषणातून जवाहरलाल नेहरू यांच्या जिवनचरीत्रावर प्रकाश टाकला. वर्षा धानोरकर यांनी सुद्धा यावेळी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय अन्य मान्यवरांनिही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. बालकदिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विवीध खेळांचे आयोजन करण्यात आले. तर यावेळी एका सांस्कृतीक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. शाळेतील शिक्षक तथा विद्यार्थ्यांनी यात भाग घेत विवीध प्रकारचे नृत्य सादर केले. सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment