Ads

शहरातील रेल्वे थांब्याबाबत अनेक संघटना आक्रमक.

जावेद शेख तालुका प्रतिनिधी: Bhandakशहरातील भांदक रेल्वेस्थानकावर यापुर्वी अनेक निवेदने देऊनही येथील एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांचे थांबे अद्याप पुर्ववत करण्यात आले नसल्याने आता शहरातील अनेक संघटना आक्रमक झाल्या असुन शहरातील परिवर्तन आटो असोसिएशनतर्फे रेल्वे गाड्यांचे थांबे पुर्ववत करण्याबाबत येथील रेल्वे प्रबंधकांना निवेदन सादर करण्यात आले आहे.शहरातील भांदक रेल्वे स्थानकावर आधी दक्षिण एक्सप्रेस, लखनऊ चेन्नई एक्सप्रेस, जोधपूर चेन्नई एक्सप्रेस, पटना एर्नाकुलम एक्सप्रेस, सिकंदराबाद एक्सप्रेस आदी रेल्वेगाड्या थांबायच्या.मात्र कोरोना काळात येथील या गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते.ते अद्यापपर्यंत पुर्ववत करण्यात न आल्याने येथील प्रवाशांचे हाल होत असुन यामुळे शहरातील आटो व्यवसायही प्रभावित झाला आहे.Many organizations are aggressive about the railway stop in the city.
भद्रावती हे औद्योगिक तथा ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहरात देशातील सर्व प्रांतातील नागरीक राहतात. तसेच पर्यटनासाठी येथे बाहेरुन मोठ्या संख्येने प्रवासी येत असतात.मात्र थांबे बंद असल्याने प्रवाशांना प्रवास करण्यात मोठ्या अडचणी येत आहे.हे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने भांदक रेल्वे स्थानकावर रद्द केलेले थांबे त्वरित पुर्ववत करण्याची मागणी परिवर्तन आटो असोशिएशन तर्फे निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करतांना आटो असोसिएशनचे कल्याण मंडल,प्रशांत दुबे,विनोद कुमरे,कैलास साखरकर,दिनेश बडकेलवार,भाऊराव राजुरकर,प्रशांत अनमुलवार,सुरेश काकडे, विकास शिल आदी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment