Ads

महिलांवर आपत्ती जनक वक्तव्य करणाऱ्या बाबा रामदेव यांचा आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे निषेध

तालुका प्रतिनिधी जावेद शेख : आज दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे सुरज भाऊ शहा यांच्या नेतृत्वात व सोनल पाटील यांच्या मार्गदर्शनात योग गुरु स्वामी रामदेव बाबा यांचा निषेध करण्यात आला.Aam Aadmi Party Bhadravati condemns Baba Ramdev's disastrous statement on women
निषेध करण्याचं कारण असं की त्यांनी एका सभेत महिलांवर आपत्ती जनक वक्तव्य केलं व विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस हे सुद्धा रामदेव बाबा सोबत त्या कार्यक्रमात उपस्थित असूनही सुद्धा त्यांनी त्या वक्तव्याचा विरोध नाही केला. त्या वक्तव्याचं राज्यभरात विरोध प्रदर्शन करण्यात आले. "मुर्दाबाद मुर्दाबाद, ढोंगी बाबा मुर्दाबाद ", "महिलाओ के सन्मान में आम आदमी पार्टी मैदान मे ", असे नारे देत आज आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी तालुका सचिव सुमित हस्तक, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, शहर अध्यक्ष प्रफुल भाऊ शेलार, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर सचिव विजयभाऊ सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज भाऊ शेख, सचिन पाटील, मंगेश खंडाळे, केशव पचारे, श्याम पिंपळकर, रितेश नगराळे, राजेश नरवडे, बाळूभाऊ बांदुरकर, प्रदीप लोखंडे, चेतन खोब्रागडे, संजय सातपुते, डोरी स्वामी, घनश्याम गेडाम व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment