Ads

अतिक्रमणधारकांना हक्काची जागा मिळवून देण्याकरीता सावली तहसिल कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा....

सावली ( तालुका प्रतिनिधी ) :
आज दिनांक 30/11/2022 ला अतिक्रमण धारकांना हक्काची जागा मिडवून देण्याकरिता सावली तहसील कार्यालयावर धडक मोर्च्या काढण्यात येणार आहे या मोर्च्यात जनतेनी सहभागी होण्याचे आवाहन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले आहेSawli Taluka Congress
Congress strike march on Sawli Tehsil office to get the encroachers their rightful place...
याबाबत सविसतर वृत्त असे की, तहसील प्रशासनाने सावली तालुक्यातील जनतेला नोटीस पाठवून सरकारी व गायरान जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवीण्याबाबत बाजवले होते त्यामुळे सावली तालुक्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते
सावली तालुक्यातील अनेक गावामध्ये सरकारी व गायरान जागेवर लोकांनी पक्के घरे बांधलेली आहेत सदर घरे ही अनेक वर्षापासून आहेत या जागेवर सरकारच्या माध्यमातून पक्के रस्ते, नाली बांधकाम, विज व्यवस्था, या सारख्या अनेक सोई उपलब्ध झाल्या आहेत मात्र शासनाच्या पत्रामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरलेले आहे
दरम्यान सदर अतिक्रमण बाबत सावली तालुका काँग्रेस कमिटीने राज्यचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सदर बाब लक्ष्यात आणून दिली असता ततकाळ त्यांनी लोकांच्या मागणी बाबत चर्चा करून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली
जनतेची घरे पाडू नयेत, व अतिक्रमण धारक गरीब जनतेला घराची कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावीत अश्या प्रमुख मागण्या या मोर्च्यात करण्यात येणार आहेत सावली तालुक्यातील जनतेनी सदर मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन सावली तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले आहे
सदर मोर्च्याचे नेतृत्व माजी मंत्री आमदार विजय भाऊ वडेट्टीवार हे करणार असून जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष प्रकाश देवतले, संदीप पाटील गड्डमवार, दिनेश पाटील चिटनूरवार, लता लाकडे, संदीप पुण्यपवार, विजय कोरेवार, यांची उपस्थित राहणार आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment