Ads

ग्रामीण रंगभूमी जपण्यासाठी सदोदित नाटकाचे प्रयोग व्हावे- आमदार प्रतिभा धानोरकर

तालुका प्रतिनिधी (भद्रावती):- ग्रामीण रंगभूमीला मोठा इतिहास आहे .विदर्भातील झाडीपट्टीत रंगभूमीचे कार्य मोठे असून अनेक कलावंत जन्माला आले व त्यांनी राज्य पातळीवर आपली छाप सोडली मात्र या ग्रामीण रंगभूमीचे जतन करणे गरजेचे असून त्यासाठी गावागावात नाटकाचे प्रयोग होणे गरजेचे असल्याचे मत भद्रावती- वरोरा निर्वाचन क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
ग्रामीण महिला सक्षमीकरणासाठी तालुक्यातील चालबर्डी येथील लोक विद्यालयाच्या प्रांगणात आधार बचत गटाच्या वतीने गायत्री रंगभूमी, शिंदेवाही - वडसा निर्मित 'अंधारलेल्या वाटा' या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.
MLA Pratibha Dhanorkar should experiment with sound drama to preserve rural theatre
यावेळी मंचावर आमदार प्रतिभा धानोरकर, ठाणेदार गोपाल भारती, घोडपेठ चे सामाजिक कार्यकर्ते अशोक येरगुडे, भास्कर ताजने, चालबर्डी सरपंच प्रियंका सोयाम, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष योगेश मत्ते, गणेश नागपुरे ,सचिन जोगी ,देऊबाबा पारसे ,श्रीधर ताजणे आदी मान्यवर मंडळींची उपस्थिती होती, ग्रामीण भागातील नव्या पिढीमध्ये नाटकाची आवड निर्माण व्हावी यासाठी या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू ताजने यांनी तर उपस्थिताचे आभार संजय वाघाडे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुंडलिक जोगी ,सतीश मालेकर, भूपेंद्र ताजणे ,पंढरी नेहारे, विलास सोनटक्के, विलास जोगी ,विश्वास मालेकर, हितेश कुमार बावणे, मारुती राऊत, निलेश नागपुरे, दीपक माटे व अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment