ऊर्जानगर:-भारतातील थोर संत सुधारकांचा विवेकी वारसा समाजामध्ये रुजवून अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ऊभी हयात समाजासाठी समर्पित करणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डाँ नरेंद्र दाभोळकर यांचा जन्मदिवस सर्वत्र विवेक जागर दिन म्हणून साजरा करण्यात आला.
Dr. Narendra Dabholkar's birthday celebrated as Vivek Jagar Day
महा अंनिसचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष मा.पी एम जाधव सर व जिल्हाध्यक्ष मा.सूर्यकांत खणके सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रधान सचिव मा.नारायण चव्हाण यांच्या घरी ऊर्जानगर शाखेतर्फे प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन करून तसेच विवेक जागर दिनानिमित्त महा अंनिसचे नवीन सभासद नोंदणी व अंनिस पत्रिकेचे देणगीदार तसेच सभासद नोंदणीला सुरुवात करून जन्मदिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला समितीचे चंद्रपूर प्रधान सचिव नारायण चव्हाण,ऊर्जानगर शाखेचे कार्याध्यक्ष देवराव कोंडेकर,सहसचिव बालकृष्ण सोमलकर,संजय जुनारे,विजय राठोड,सुरेंद्र इंगळे,पिंगेजी व ईतर सभासद यांची उपस्थिती होती.यावेळी नारायण चव्हाण यांनी डाँ नरेंद्र दाभोळकर यांच्या जीवनकार्यावर सर्वांना माहिती दिली व अंधश्रद्धा निर्मूलन समज गैरसमज यावर प्रकाश टाकला.
0 comments:
Post a Comment