भद्रावती:- श्रीसंत झिंगुजी महाराज देवस्थान समितीच्या वतीने श्रीसंत झिंगुजी महाराज यांच्या ८३ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन दि. २९,३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाद्वारे श्रीसंत झिंगुजी देवस्थान (मठ) मेन रोड भद्रावती येथे करण्यात आले आहे.
मंगळवार दि.२९ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता श्रींची पूजा आरती व घटस्थापना, सकाळी ८ वाजता नगर स्वच्छता अभियान,१० वाजता भजनसंध्या,दुपारी १२ वाजता रांगोळी व चित्रकला स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता भजन,सायंकाळी ७ वाजता सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य ह.भ.प. पंकजपाल महाराज मु.रुई ता.मानोरा जिल्हा वाशिम यांचा प्रबोधनात्मक जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम व रात्री १०:३० वाजता जागृती भजनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
बुधवार दि.३० नोव्हेंबरला सकाळी ६ वाजता श्रींची पूजापाठ व आरती,सकाळी ११ वाजता रक्तकेंद्र, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर यांचे विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर,दुपारी २ वाजता भजन,सायंकाळी ४ वाजता बक्षीस वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.याप्रसंगी खा. बाळुभाऊ धानोरकर,आ.प्रतिभाताई धानोरकर,माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजभैय्या अहिर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसिलदार अनिकेत सोनवणे,ठाणेदार गोपाल भारती, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर,महाराष्ट्र राज्य मागासर्गीय महामंडळ मुंबईचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे,चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ अध्यक्ष कृष्णाजी नागपुरे,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार,विदर्भ भोई समाज सेवा संघ अध्यक्षा रंजनाताई पारशिवे,नगरसेवक नंदूभाऊ पढाल,नगरसेविका शितल गेडाम, भद्रावती पत्रकार संघ माजी अध्यक्ष दिलीप मांढरे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. सायंकाळी ६ वाजता शिंदे परिवार यांचे सौजन्याने, महारोगी सेवा समिती वरोरा व डॉ.विकास बाबा निर्मित "स्वरानंदवन" "Swaranandavan"आनंदवन तुमच्या दारी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
गुरुवार दि.१ डिसेंबर सकाळी ६ वाजता श्रींची पूजापाठ ,सकाळी १०:३० वाजता व्यसनमुक्ती सम्राट ह.भ.प.मधुकरराव खोडे उपाख्य खराटे महाराज मु. ईसापूर ता. दिग्रस जिल्हा यवतमाळ यांचे गोपालकाल्याचे किर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होईल.दुपारी १ वाजता श्रींच्या पालखीची भद्रावतीच्या प्रमुख मार्गाने बँड पथक व भजन दिंडीसह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे,तरी या तीन दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचे कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष सुनिल पढाल व सचिव पवन मांढरे यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment