Ads

व्हि.डी.ओ. चित्रफीत बनवून उच्चपदस्थ वैद्यकीय अधिकाऱ्याकडे ५० लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

चंद्रपूर : एका महिलेसोबतचे बेडरूम मधील चित्रफित पाठवुन प्रसारीत करण्याची धमकी देवून 3 लाख लुबाडणाऱ्या टोळीचे समाधान झाले नाही, परत 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या एका टोळीला स्थानिक गुन्हे 'ने जेरबंद केल्याची घटना मंगळवारी घडली यामुळे खळबळ माजली आहे.The local crime branch arrested a gang that demanded ransom of Rs 50 lakh from a high-ranking medical officer by making video tapes.
दिनांक 29/11/2022 रोजी चंद्रपूर शहरातील एका उच्चपदस्थ वैद्यकीय अधिकाऱ्याने मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचेकडे तक्रार दिली की, काही इसमांनी संगणमत करून काही महिण्यापुर्वी त्यांना फ्लॅटवर बोलवून एका महिलेसोबतचे बेडरुममध्ये छुपा कॅमेरा लावून चित्रफीत तयार केली व काही दिवसांनी ती रेकॉर्ड केलेली चित्रफीत तक्रारदार यांना पाठवून ति प्रसारीत करण्याची धमकी देवून 3,00,000/- रू. ची खंडणी उखळली होती. त्यानंतर पुन्हा खंडणी वसुल करण्याची लालसा निर्माण झाल्याने सदरची चित्रफीत एका अनोळखी इसमास पाठवून त्याचे मार्फतीने तक्रारदार यांना आणखी 50,00,000/- रू.चे खंडणीची मागणी करीत असून त्या अनोळखी इसमाने त्याचे मोबाईलवरून तक्रारदार यांना सदर चित्रफीतीचे स्क्रिनशॉट पाठवून ति चित्रफीत सामाजीक माध्यमावर प्रसारीत करण्याची धमकी देत आहे. त्यावर तक्रारदार याने त्याचेकडे पैसे नसल्याचे सांगीतल्याने अनोळखी इसम हा तक्रारदार यांचे कार्यालयात जावून तक्रारदार यांचेकडून 5,00,000/- रू.चा चेक व काही नगदी रक्कमेची मागणी केली आहे या तक्रारीचे अनुषंगाने कारवाई करणे सबंधाने मा.पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी पोलीस निरीक्षक स्था. गु.शा. बाळासाहेब खाडे यांना आदेशीत केल्यावरून त्यांनी खंडणी मागणाऱ्या अनोळखी इसमास पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील स.पो.नि. जितेंद्र बोबडे, मगेश भोयर, संदिप कापडे, पोउपनि अतुल कावळे यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दि. 29/11/2022 रोजी खंडणी मागणारा इसम सादीक खॉन रसिक खॉन पठाण यास तक्रारदार यांचेकडून 30,000/- रू. रोख व 5,00,000/- रू. चा चेक घेत असतांना रंगेहात पकडले व त्यास अधिक विचारपूस केली असता त्याने सांगीतले की, सादीक खान याच्या मैत्रीणीने तिचे मोबाईल वरून पाठविले व तिने त्यास संबंधीत उच्च पदस्थ अधिका-यास पाठवुन व भेटुन प्रसारीत करण्याची धमकी देवुन पैशाची मागणी करण्यास सांगीते त्यानुसार त्याने सदर कामाकरीता त्याचे नावावर नविन सिम कार्ड घेतले व त्या मोबाईल क्रमांकावरून तक्रारदाराचे मोबाईलवर व्हॉट्सअॅप द्वारे चित्रफितीचे स्किन शॉट पाठविले व ते प्रसारीत करण्याची धमकी देवुन प्रकरण संपवायचे असल्यास भेटण्यास प्रवृत्त केले व भेटीमध्ये 50 लाख रू. खंडणीची मागणी केली. तक्रारदाराने ऐवढे पैसे नसल्याचे सांगीतले तेव्हा त्याने पाच लाख रू. चे चेक व असतील तेवढी रोख रक्कम देण्यास सांगीतले. तसेच अधिक चौकशी मध्ये निष्पन्न झाले की, सदरची चित्रफित ही आरोपी नामे झिबल मारोतराव भारसाखरे याने त्याची दुसरी पत्नी (आरोपी) हिचे राहते घरी छुपा कॅमेरा लावुन चित्रफित मध्ये असलेल्या आरोपीत महीलेच्या संगणमताने तक्रारदार यांना घरी बोलावुन बेडरूम मध्ये चित्रीकरण केले होते. त्यावरून आरोपी नामे 01 ) सादीक खॉन व 02 ) झिबल भारसाखरे व त्यांच्या इतर तिन महिला आरोपीत साथीदारांविरूद्ध पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्र. 641/2022 कलम 384, 385, 34 भा.द.वी. प्रमाणे खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंग संतोषसिंग परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पो.उप.नि. अतुल कावळे, पोलीस अंमलदार संजय आतकुलवार, प्रकाश बलकी, प्रमोद डंबारे, संतोश येलपुलवार, कुंदन बावरी, नितीन रायपूरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहूले, अजय बागेसर, भास्कर चिचवलकर, महिला अंमलदार अपर्णा मानकर, निराशा तितरे, सोनाली पेन्दाम यांनी केली.
पोलीस विभागाकडुन अपील
पोलीस विभागाकडुन आव्हान करण्यात येते की, अशा प्रकारे हनी ट्रॅप करून कोणाला खंडणीची मागणी होत असल्यास त्यांनी संबंधीत पोलीस स्टेशनला किंवा मा. पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना प्रत्यक्ष भेटुन तकार दाखल करावी. त्यांचे नांव गोपनिय ठेवण्यात येईल.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment