चंद्रपुर :चेन्नई ट्रेड सेंटर, चेन्नई येथे दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या "सिप नॅशनल प्रॉडिजी 2022 इंडिया" "SIP National Prodigy 2022 India" स्पर्धा परिक्षेमध्ये विविध राज्यातून सुमारे चार हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून सिप अॅबाकस,(sip abacus), सिव्हील लाईन्स चंद्रपूर सेंटरमधील अतिशय बुध्दीमान व शिस्तप्रिय स्वभाव असलेला राजस अमित येरगुडे हा बि. जे. एम. कारमेल अकादमी तुकूम, चंद्रपूर येथिल इयत्ता 6 व्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी सहभागी झाला होता.
वरील स्पर्धा परिक्षेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून राजस अमित येरगुडे हा विद्यार्थी नेत्रदिपक यश संपादन करून राष्ट्रीय स्तरावर "फर्स्ट रनर अप' विजेता पदाचा मानकरी ठरला आहे. याबद्दल त्याचे अभिनंदन व कौतुक करून तसेच पदक बहाल करून गौरवान्वित करण्यात आले.
यापूर्वी सुध्दा सिप अॅबाकस अकादमी इंडिया व्दारा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या अॅबाकस स्पर्धा 2022 मध्ये राजस अमित येरगुडे सहभागी झाला होता व या स्पर्धा परिक्षेत प्राविण्यासह उत्तिर्ण होउन राष्ट्रीय स्तरावर 3 रा राज्य स्तरावर 2 रा तर सिप अॅबाकस, सिव्हील लाईन्स चंद्रपूर केंद्रातून परफॉरमर विजेता ठरला होता हे विशेष.
राजस याने आपल्या यशाचे श्रेय सिप अॅबाकस, सिव्हील लाईन्स सेंटर चंद्रपूर चे संचालक राहूल जैन सर व मिनाक्षी मॅडम तसेच आई-वडील यांना दिले आहे. राहूल जैन सर व मिनाक्षी मॅडम यांनी राजसला नियोजनबध्द व योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.
0 comments:
Post a Comment