चंद्रपूर : जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा आपले वर्चस्व गाजवत इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या 3 संघांनी बॅडमिंटन स्पर्धेत वेगवेड्या गटांमध्ये व्दितीय स्थान पटकाविले आहे. याच स्पर्धेतून शाळेच्या पाच बॅडमिंटनपटुंची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.Selection of 5 Badminton players of Indira Gandhi Garden School at Divisional level
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत शाळेच्या १४ वर्षांखालील मुले व मुलींचे संघ आणि १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
विभागीय स्पर्धेसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता आठवीतील 14 वर्षांखालील खेळाडू लाभ तरसे, शौर्य नागरगोजे आणि शर्वरी दाणी आणि इयत्ता नववीतील 17 वर्षांखालील वयोगटातील खेळाडू निर्मिती बदखल आणि श्रावणी कळसकर यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे त्यांची निवड करण्यात आली आहे.
शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल चव्हाण व रेशमा पठाण यांनी स्पर्धेसाठी बॅडमिंटन खेळाडूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. उपविजेता संघांचा व विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा शाळेचे मुख्याध्यापिका बावनी जयकुमार यांच्या हस्ते शाळेत सन्मान करण्यात आला.शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राहुल पुगलिया, समितीचे पदाधिकारी व सदस्य, शाळेचे प्रशासक जयकुमार सर, सर्व शिक्षकगण व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
0 comments:
Post a Comment