तालुका प्रतिनिधी (भद्रावती):-
शहरातील जलशुद्धीकरण केंद्रापासून केसुर्ली प्रभागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जोडण्यात आलेली तिस ते पस्तीस फुट पाईपलाईन अज्ञात चोरट्यांनी चोरल्यामुळे केसुर्ली प्रभागाचा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. या घटनेची तक्रार भद्रावती नगर परिषद प्रशासनाने भद्रावती पोलीसात केली आहे.या पाईपलाईन सोबतच शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या सुशोभिकरणातील चार विद्युत दिवेही अज्ञात चोरट्यांनी लांबविले
शहरातील जलशुद्धीकरण केंद्रापासून केसुर्ली प्रभागात पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने दोन हजार एम एम सि आय ची पाईपलाईन टाकलेली आहे.या मार्गावरील दुर्योधन याच्या शेताजवळ अंदाजे तिस ते पस्तीस फुट पाईपलाईन अज्ञातज्ञचोरट्यांनी लांबविली आहे. हि चोरी दोनदा झाली आहे .पाईपलाईन चोरीला गेल्यामुळे केसुर्ली प्रभागाचा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे.
सध्या शहरात सर्वत्र वाढला असुन शहरात अनेक चोरीच्या घटना होत आहे.या प्रकाराकडे सध्या भद्रावती पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाचे नुकतेच सौंदर्यीकरण करून तेथे विद्युत दिवे लावण्यात आले होते.यातील चार दिवे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले.या दोन्ही प्रकाराची तक्रार करण्यात आली आहे. गजबजाट असलेल्या चौकातील विद्युत दिवे चोरी जात असल्यानेही पोलीस प्रशासन चुप का ?अशा शंका नागरिकात वर्तविल्या जात आहे.
0 comments:
Post a Comment