भद्रावती: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील जाम - वरोरा- चंद्रपूर- बल्लारपूर- बामणी रस्त्यावर नवीन सुमठाणा ते एन टी पी सी सर्विस रोड ( सेवापथकाच्या ) बांधकामास नव्याने प्रसासकीय मान्यता देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी बांधकाम मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने सांस्कृतिक, मत्सव्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना केली.
दिनांक ८/१२/२०२१ ला वरील बांधकामाला प्रसासकीय मान्यता शासन निर्णय क्र पि एल एन २०२१/ सी. आर. २६९३/ नि.३ नुसार वरील बांधकामाला मंजुरी देण्यात आली होती.एक वर्षाचा कालावधी होऊन सुध्दा या सेवापथकाच्या बांधकामास सुरुवात न झाल्याने या रस्ता बांधकामाला आपोआप स्थगीती मिळाली होती. नविन सुमठाणा ते एन टी पी सी गेट पर्यंत दोन्ही बाजूला सर्विस रोडचे बांधकाम करतांनी दुभाजकावर स्ट्टि् लाईट लावने असा प्रकारची मागणी वारंवार करीत आलो तसेच येथील जेस्ट नागरिकांकडून सुध्दा मी जिल्हा परिषद सदस्य केली होती.
या रोडला प्रशासकीय मान्यता देत असताना या बांधकामाला लागणारा अंदाजीत खर्च रुपये नव कोटी (₹ ९०००००००) चा होता तसेच तसेच या रोडला प्रशासकीय मान्यता देत असताना हा रस्ता " ५०५४ मार्ग व पुल या वरील भांडवली खर्च ०३ राज्यमार्ग " या शिर्षीखाली घेण्यात आला होता पण सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर च्या वरीष्ठ अधिकारी यांच्या हलगर्जीपणा मुळे मंजूर झालेले सर्विसरोडचे बांधकाम सुरू होवू शकले नाही त्या मुळे येथील नागरिकांना आपले जिव सुध्दा गमवावे लागले तेव्हा ज्या अधिकार-याच्या हलगर्जीपणा मुळे हा दुभाजक रस्ता होऊ शकला नाही अशा अधिका-यांवर आपल्या कामात दुर्लक्ष व कसुर केल्याबद्दल त्यांच्यावर उचित कार्यवाही करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
0 comments:
Post a Comment