Ads

सुधीरभाऊंच्‍या भेटीने पांडूरंग भेटीचा आनंद- प्रा. दैवत बोरकर

चंद्रपुर : ज्‍येष्‍ठ नेते, कार्यक्षम, कार्यतत्‍पर लोकप्रतिनिधी, विकासपुरूष अशी अनेक विशेषणे ज्‍यांच्‍या कर्तृत्‍वासमोर थिटी पडावीत असे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची आज झालेली भेट माझ्यासाठी संस्‍मरणीय ठरली. सुधीरभाऊंनी माझे केलेले स्‍वागत माझ्यासारख्‍या सामान्‍य प्राध्‍यापकाला बहुमान देवून गेले. सुधीरभाऊंची सहृदयता, संवेदनशीलता, त्‍यांचे उत्‍तुंग कार्य या सर्व बाबींचा उहापोह माझ्या शोध प्रबंधात मी जरी केला असला तरी आज मला प्रत्‍यक्ष पांडूरंग भेटीचा आनंद झाल्‍याची प्रतिक्रिया महात्‍मा ज्‍योतीबा फुले कनिष्‍ठ महाविद्यालय तळोधी (बाळापूर) येथील प्राध्‍यापक दैवत बोरकर यांनी व्‍यक्‍त केली.
The joy of visiting Pandurang with Sudhir Bhau's visit - Prof. Daiwat Borkar
२५ डिसेंबर रोजी प्रा. दैवत बोरकर यांनी वने व सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी प्रा. दैवत बोरकर यांचा शाल, श्रीफळ आणि तिरंगा ध्‍वज भेट देत सत्‍कार केला व आचार्य पदवी प्राप्‍त केल्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदन केले. लोकप्रतिनिधी म्‍हणून मी केलेल्‍या कार्याचा गौरव शोधप्रबंधाच्‍या माध्‍यमातुन करत माझ्याविषयी जी सद्भावना प्रा. दैवत बोरकर यांनी व्‍यक्‍त केली ती माझ्यासाठी लाख मोलाची आहे अशी भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली व दैवत बोरकर यांना त्‍यांच्‍या पुढील कार्यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या.

महात्‍मा ज्‍योतीबा फुले कनिष्‍ठ महाविद्यालय तळोधी (बाळापूर) येथील प्राध्‍यापक दैवत बोरकर यांनी ‘‘सुधीर मुनगंटीवार यांचे राजकीय नेतृत्‍व’’ – एक चिकित्‍सक अध्‍ययन (१९९५ – २०१५) या विषयावर आचार्य पदवीसाठी सादर केलेल्‍या शोधप्रबंधाला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्‍या माध्‍यमातुन मान्‍यता प्रदान करत पीएचडी घोषीत करण्‍यात आली आहे. पीएचडी घोषीत झाल्‍यानंतर प्रा. दैवत बोरकर यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment