Ads

उद्या सोमवारी २०० युनिट विज मोफत द्या या मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेडची अधिकार बाईक रॅली नागपूर विधान भवनावर धडकणार

चंद्रपुर :चंद्रपूर जिह्यातील नागरिकांना घरगुती वापरातील २०० युनिट विज मोफत द्या या मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेडची अधिकार बाईक रॅली नागपूर विधान भवनावर धडकणार असुन या बाईक रॅलीत हजारो दुचाकींचा समावेश असणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी या बाबतच्या तयारीची पाहणी केली आहे.
Young Chanda Brigade's rights bike rally will hit Nagpur Vidhan Bhavan to demand 200 units of free electricity tomorrow Monday.
चंद्रपूर जिल्ह्या हा विज उत्पादक जिल्हा आहे. कोळश्यावर आधारीत विज प्रकल्प येथे चालत असल्याने चंद्रपूरकरांना प्रदुषनाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्याच्या मोबदल्या स्वरुप चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील २०० युनिट विज मोफत देण्यात यावी, शेतीसाठी विज मोफत देण्यात यावी, उद्योग वाढीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
याच मागणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात आयोजित अधिकार बाईक रॅलीची जय्यत तयारी सुरु असुन उद्या सकाळी सात वाजता गांधी चौकातुन रॅलीला सुरवात होणार आहे. या बाईक रॅलीमध्ये चंद्रपूरसह जिल्हाभरातुन नागरिक गांधी चौक येथे पोहचणार असुन याची जय्यत तयारी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर ते नागपूर या रॅलीच्या मार्गाची व येथील तयारीची पाहणी केली आहे. या रॅलीला अभुतपुर्व प्रतिसाद मिळत असुन भव्य बाईक रॅली निघणार असल्याचा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment