Ads

रापम व्यापारी असोसिएशन च्या जिल्हाध्यक्ष पदी विशाल सेजपाल तर जिल्हासचिव पदी धनराज कोवे यांची निवड

चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगारात आज दि. 24 डिसेंबर 2022 रोज शनिवार ला जिल्ह्यातील विविध आगारातील व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. सदर बैठक एस. टी.कँटीन व स्टॉलधारक वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री. राम हराळ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये घेण्यात आली. तेव्हा सचिव श्री विजय ऐथाळ,राम बापू हदगुले,इरफान शेख, शंकर कांमडी, यांची प्रमुख उपस्थिती होती.

Election of Vishal Sejpal as District President of S T Stand Traders Association and Dhanraj Kove as District Secretary
सदर बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व रापम च्या आगारातील व्यापारी उपस्थित राहून विविध विषयावर चर्चा केली व व्यापाऱ्यांच्या समस्या आणि तक्रारी ची सोडवणूक करणे करिता एस. टी.कँटीन व स्टॉलधारक वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्यांची चंद्रपूर जिल्हा शाखा तयार करण्यात आली. जिल्हा कार्यकारणी मध्ये अध्यक्ष पदी श्री. विशाल शेजपाल यांची सर्वानु मते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून श्री. नवीन चोरडिया,सचिव पदी धनराज कोवे,तर कार्यध्यक्ष म्हणून रफिक भाई,मार्गदर्शक लाजिंदर सिंग गडहोक, तर सदस्य म्हणून निखिल सेजपाल,बंटी कडवे,भूषण शिरजगावकर, पोलपालेवार,सय्यद इरफान, किशोर कांमडी,जमिल शेख,राजकुमार डोंगरा यांची नियुक्ती करून कार्यकारणी तयार करण्यात आली. सदर नवंनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. आणि पुढील वाटचाली करीत शुभेच्छा देण्यात आली. मार्गदर्शनात मान्यवरांनी सांगितले की जिल्ह्यातील सर्व आगारातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना असोसिएशन मध्ये घेण्यात यावे. आणि समस्यां सोडविण्या साठी संघटनात्मक एकता हाच मार्ग आपण अंगिकारला पाहिजे असे सांगीतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment