Ads

कर्तव्य सेतु केंद्र लोक उपयोगी ठरणार-आ. अशोक रावसाहेब पवार

चंद्रपुर :मतदार संघातील नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे ही लोप्रतिनीधींची जबाबदारी आहे. मात्र या सोयी सुविधांमध्ये नागरिकांना निशुल्क सेतु केंद्राची सेवा उपलब्ध करुन देणे हा उपक्रम नवा आहे. मुळात हि संकल्पनाच कौतुकास्पद असुन आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील नागरिकांसाठी सुरु केलेले निशुल्क सेवा देणारे कर्तव्य सेतु केंद्र लोक उपयोगी ठरणार असल्याचे पुणे जिल्हातील शिरुर - हवेली मतदार संघाचे आमदार अशोक रावसाहेब पवार म्हटले आहे.
आज चंद्रपूरात असतांना पुणे जिल्हातील शिरुर - हवेली मतदार संघाचे आमदार अशोक रावसाहेब पवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरु झालेल्या कर्तव्य सेतु केंद्राला भेट देत या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कृषी अभ्यासक मिलींद राऊत यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप , शिक्षण विभाग प्रमुख प्रतिक शिवणकर, प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, अल्पसंख्याक युथ अध्यक्ष राशेद हुसेन, देवा कुंटा आदींची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जनसंपर्क कार्यालयात कर्तव्य सेतु केंद्र सुरु करण्यात आले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सदर केंद्राचे लोकार्पण करण्यात आले होते. या सेतु केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची निराधार कार्ड, जाती प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना प्रमाणपत्र यासह ईतर महत्वाचे कागदपत्रे बनवून दिल्या जात आहे.
दरम्यान आज शिरुर - हवेली मतदार संघाचे आमदार अशोक रावसाहेब पवार हे चंद्रपूरात आले असता त्यांनी सदर सेतु केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील कामाची पध्दत जाणून घेत उपक्रमाचे कौतुक केले. अशी कल्पना येने हीच मोठी बाब आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी कल्पनेला वस्तुस्थित साकारले आहे. त्यामुळे नागरिकांना आता तहसील कार्यालयात भेर्या मारण्याची गरज पडणार नाही. त्यांची कामे निशुल्करित्या सहज येथे होतील. असा उपक्रम आपणही आपल्या मतदार संघात सुरु करण्यासाठी प्रयत्न करु असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी आमदार पवार यांनी अम्माची भेट घेत अम्मचा का टिफीन या उपक्रमालाही भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment