चंद्रपुर :रामसेतु दाताळा रोड वरील ब्रीज ला रोषणाई करण्याकरिता 3 कोटी रुपये खर्च केले म्हणून पालकमंत्री गवगवा करतात .मात्र जिथे ब्रिजची अत्यंत गरज असताना तिथे मागील 10 वर्षापासून सुरु असलेल्या बाबुपेठ नवनिर्मित ब्रीज चे काम मंद गतीने सुरू आहे यावर अजून पर्यंत पालकमंत्री यांनी तोंडून ब्र सुध्दा काढला नाही.
बाबूपेठ मधील रेल्वे गेट मुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी असो अथवा कामावर जाणारे कामगार किंवा आपात्कालीन वेळेत रुग्णालयात धाव घेणाऱ्या रुग्णांना या रेल्वे गेट मुळे एक एक तास अडकून राहावे लागते. तसेच या ब्रिज वरती मोठ्या प्रमाणात नागरिकांची दररोज ये - जा सूरु असते. 30 वर्षापासून या ठिकाणी रेल्वे ब्रीज ची मागणी असून लोकप्रतिनिधीनी याकडे पाठ फिरवली आहे.
मागील 2017 च्या मनपा निवडणूकी दरम्यान विद्यमान पालकमंत्री तथा वन मंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी दोन ते तीनदा या ब्रीज च्या कामाचे भूमिपूजन केलें होतें, परंतु निवडणूक होऊन सत्तेत येताच त्यांना याचा विसर पडला की काय तसेच रोशनाई महत्वाची की बाबुपेठ पुल असा प्रश्न बाबुपेठ ची जनता करू लागली आहे.
या ब्रिजच्या पाठोपाठ दाताला आणि पठानपुरा गेट समोरील ब्रीज चे काम सुरू झाले होते मात्र या दोन्हीं ब्रीज चे काम पुर्ण होऊन 2 वर्ष लोटून गेले परंतू बाबूपेठ ब्रीज चे काम आजपावेतो 50 टक्के सुध्दा पूर्ण न झाल्याने जनतेमध्ये शासन आणि प्रशासना बद्दल रोष व्यक्त केला जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टी चे शहर सचिव तथा सहप्रभारी राजू कुडे यानी केला असून आता तरी विशेष निधि उपलब्ध करुण बाबूपेठ उड़ान पुलाच्या कामाला गति द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे .
लवकरच आम आदमी पार्टी तर्फे ह्या मागणीला घेऊन ठीय्या आंदोलन करन्यात येईल असा इशारा आप तर्फे देण्यात आला आहे.
0 comments:
Post a Comment