चंद्रपूर -समाजातं असलेल्या दिव्यांग व्यक्ती आत्मनिर्भर होण्यासाठी समाजातील धनवान लोकांनी पुढे येण्याची गरज असून मी आजवर सातत्याने अशा उपक्रमाचा पाठीराखा असून योगदान दिलेले असून भविष्यातही दिव्यांग, उपेक्षित व गरजवन्तासाठी मी सदैव सहकार्य असल्याचे प्रतिपादन चंद्रपूरातील युवा नेतृत्व गणल्या गेलेले इरफान शेख यांनी चंद्रपूरातील तुळशीनगर परिसरात विकलांग सेवा बचत गट कार्यालयाचे उदघाटन करताना उपस्थितासमोर प्रतिपादन केले.
व्यासपीठावर सुभाष कासूनगोट्टूवार,सामाजिक कार्यकर्त्यां सिमा ठाकूर, शिवसेना महानगर शहर प्रमुख वर्षा कोठेकर, विकलांग सेवा संस्थेचे सचिव देवराव कोंडेकर, नंदा बिहाडे व अन्य उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह बँक शाखा दुर्गापूर व जिल्हा परिषद चंद्रपूर समाज कल्याण विभागाद्वारा लाभलेल्या आर्थिक योगदानातून दिव्यांग आत्मनिर्भर उपक्रम या ठिकाणी शुभारंभ होत असून जागतिक दिव्यांग दिनाचे ओचित्य साधून पूर्वसंध्येला सुरु झालेले केंद्र नावारूपाला येवो अशा शुभेच्छा भाजप नेते सुभाष कासूनगोट्टूवार यांनी व्यक्त केल्यात.
याप्रसंगी निवडक गरजू व्यक्तीला ब्लॅंकेट्स वितरित करण्यात आलेत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पूर्वा मेडपल्लीवार, पूजा प्रसाद पान्हेरकर, शिवानी बोबडे, खुशाल ठलाल, संजय डाखोरे यांनी प्रयत्न केले.
0 comments:
Post a Comment