Ads

मराठ्यांना ओबीसीत आरक्षण नक्कोच

चंद्रपूर :राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहिर यांनी महाराष्ट्राने शिफारस केल्यास मराठ्यांना ओबीसीत स्थान देवू असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याबद्दल ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी निराशा दाखवून खंत व्यक्त केली आहे.Marathas don't need reservation in OBC
माजी खासदार व देशाचे माजी मंत्री हंसराज अहिर हे ओबीसी मतदारांच्या भरोश्यावर उच्च पदावर गेले. आज त्यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद प्राप्त झाले. त्यांच्या कडून ओबीसी समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत. इतके दिवस झाले अहिर हे ओबीसी समाजात वावरत आहेत. त्यांना ओबीसी समाजातील समस्यांची जाण आहे, तरी देखील त्यांचे हे वक्तव्य खेदजनक व संतापजनक आहे. या अगोदर ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करू नये, याकरीता अनेक निवेदने, मोर्चा, धरणे, व विविध आंदोलने केलेली होती, याची जाण त्यांनी ठेवावी, असे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

डॉ. अशोक जीवतोडे यांनी खंत व्यक्त केल्या नंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहिर यांनी दिला खुलासा

ओबीसी समाजाचा तीव्र संताप लक्षात घेता व ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी खंत व्यक्त केल्या नंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहिर यांनी खुलासा सादर केला आहे.
      हंसराज अहिर म्हणाले की,ओबीसी आयोगाचा अध्यक्ष म्हणून विद्यमान ओबीसी प्रवर्गातील जातींना कसलाही धक्का लागू देणार नाही. त्यांच्या संरक्षण करता मी आयोगाचा अध्यक्ष आहे अन्य कोणत्याही जाती ओबीसी मध्ये घेण्याचा अधिकार मला नाही, हे मी स्पष्ट करतो. आरक्षणाला कसलीही कपात होऊ देणार नाही त्यांचे संरक्षण व प्रगती करिता मी आयोगाचा अध्यक्ष आहे, असे मराठा आरक्षणबाबत विचारलेल्या प्रश्नावर मी स्पष्ट करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment