Ads

वाघाचा हल्ल्यात शेळकी जखमी

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव वन क्षेत्र अंतर्गत येणारे उटी माल जवळील उमा नदी परिसरात शेळकी ईसम हा शेळ्या चारायला गेला असता अचानक वाघ त्याच्या समोर येऊन त्याच्यावर हल्ला चढवला त्यामुळे शेळ्या चारायला नेणारा शेळकी हा वाघाच्या हल्ल्यांमध्ये जखमी झाला असून ही घटना आज दि.31 डिसेंबर ला शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडली आहे.Shepherd injured in tiger attack
सविस्तर वृत्त असे की, जखमी चे नाव दादाजी गंगाराम ननावरे वय 85 राहणार उटी माल तालुका सिंदेवाही असे असून आज दि.31 डिसेंबर ला शनिवारी रोजी दादाजी नन्नावरे हा शेळ्या चारण्याकरता उटी माल कडील उमा नदी परिसरात कडे शेळ्या चारत असताना दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानकपणे वाघ समोर आला शेळ्या पकडू नये म्हणून दादाजी ननावरे हा स्वतः शेळ्या समोर उभा होऊन वाघाला पळविण्यासाठी वाघा वर जोरात दटावला असता त्याच्यावर वाघाने हल्ला चढवला त्याला जखमी केले व पळुन गेला . अशी माहिती नवरगाव वन विभागाला मिळताच नवरगाव वनक्षेत्र सहायक उसेंडी व वनरक्षक वैद्य व सहारे हे घटनास्थळी पोहोचले असून जखमी झालेल्या दादाजी ननावरे याला उपचारा करता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे भरती केले व पुढील उपचारा करता रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे अशी माहिती वनपरीक्षेत्र सहाय्यक उसेंडी यांनी सांगितले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment