A truck collided with a bike; Three people from the same family were injured in the accident
वरोरा तालुक्यातील कवडसी बोरगाव येथील रोशन गुलाब ढवस हे आपल्या मुलीची तब्बेत दाखविण्याकरीता वरोरा येथील एका खासगी दवाखान्यात आले होते. काम झाल्यानंतर ते त्यांची पत्नी व मुलगी आपल्या दुचाकीने आपल्या गावाकडे जात असतांना रत्नमाला चौकातील ऊडानपुलाजवळ नागपुरकडे जाणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीचालक,त्याची पत्नी व मुलगी जखमी झाली.सर्व जखमींना ऊपचारासाठी ऊपजील्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रकचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन घटनेचा अधीक तपास पोलीस करीत आहे.ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जखमी..
भद्रावती तालुका प्रतिनिधी : मुलीला दवाखाण्यातून आपल्या गावाकडे जात असलेल्या एका इसमाच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जखमी झाले.सदर घटना वरोरा शहरातील रत्नमाला चौकात सोमवारला दुपारच्या वेळेस घडली.तिन्ही जखमींना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात ऊपचारासाठी भरती करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment