ब्रह्मपुरी : वाळू घाटातून अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला अडवून कारवाईकरिता तहसील कार्यालयात ट्रॅक्टर लावण्यास सांगितले असता दोन महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजता दरम्यान घडली . याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून कलम ३८ ९ , ३५३ , १८६ , ३४ अन्वये तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
Two revenue officers beaten up at Sand Ghat
मौजा भालेश्वर वैनगंगा नदी घाटातून अवैधरीत्या रेती उपसा करून ट्रॅक्टरने अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार उषा चौधरी यांच्या लेखी आदेशाने महसूल मंडळ अधिकारी पितेश्वर गोविंदा येरमे ( ५३ ) व तलाठी हेमराज मधुकर दानवे हे भालेश्वर येथील वैनगंगा नदीकिनाऱ्यावर गेले असता रेतीने भरलेला विना नंबरचा ट्रॅक्टर आढळून आला .अधिकाऱ्यांनी कारवाई करीत ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यास सांगितले असता दुचाकीवर येत मोहित डेंगे , सुनील वाघधरे यांनी अधिकाऱ्यांच्या दुचाकीची चावी काढून फेकली . तुम्ही माझा ट्रॅक्टर कसा काय अडविला असे म्हणून शिवीगाळ करून दोन्ही अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली.दरम्यान, सुनील वाघधरे हा शिवीगाळ करून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले व महसूल अधिकाऱ्यांनी आरोपींविरोधात ब्रम्हपुरी पोलिसात तक्रार दाखल केली .
0 comments:
Post a Comment