भद्रावती तालुका प्रतिनिधी:-WCL Wani Area वेकोलीच्या वनी क्षेत्रातील बेलोरा नायगाव या कोळसा खाणीने आपल्या कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट निर्धारित कालावधी पेक्षा 72 दिवस आधीच पूर्ण करून वे कोली क्षेत्रात एक इतिहास रचला आहे हे सर्व खाणीतील अधिकारी तथा कामगारांच्या अथक परिश्रमामुळेच शक्य झाल्याचे मत खान प्रबंधक आर. के. आचार्य यांनी व्यक्त केले. हे उद्दिष्ट साध्य झाल्याबद्दल खाणी मध्ये मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.Bellora Naigaon mine creates history by meeting production target 72 days ahead.
याशिवाय अतिरिक्त कोळसा उत्पादनाचे देण्यात आलेले उद्दिष्ट ही निर्धारित वेळेच्या आत साध्य करण्यात येईल, असा ठाम विश्वास खान प्रबंधक आर. के. आचार्य यांनी व्यक्त केला आहे.
वेकोली वणी क्षेत्राच्या बेलोरा नायगाव खाणीला यावर्षी 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधी करता दहा लक्ष टन कोळसा उत्पादनाचे लक्ष देण्यात आले होते .खान प्रबंधक आचार्य यांनी या लक्षाची जबाबदारी उचलित अधिकारी व कामगारांच्या सहकार्याने हे लक्ष अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 72 दिवसापूर्वीच साध्य केले.. विशेष म्हणजे या कालावधीत कोळसा खाणीत उद्दिष्ट पूर्ण करताना कोणतिही अनुचित घटना घडली नाही, हे उद्दिष्ट पूर्ण करून या खाणीने वेकोलीच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला आहे. याशिवाय या खाणीत अतिरिक्त दोन लक्ष कोळसा उत्पादनाचे लक्ष देण्यात आले आहे ते उद्दिष्ट ही आम्ही येथील अधिकारी तथा कामगार यांच्या प्रामाणिक प्रयत्नाने निर्धारित वेळेपेक्षाही कमी दिवसात पूर्ण करू असा विश्वास खान प्रबंधक आचार्य यांनी व्यक्त केलेला आहे. हे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल बेलोरा नायगाव खाणीत आज मिठाईचे वाटप करून जल्लोष व आनंद साजरा करण्यात आला. यावेळी खान प्रबंधक आर. के. आचार्य, संदीप वागले, राजकुमार, सुरेश सिंग गौर, कलई सेलवण, प्रशांत पाचपोर, आशुतोष सातपुते, रमाकांत शर्मा, प्रेमानंद कांबळे आदीं अधिकाऱ्यासह कामगार नेते, कार्यालयीन कर्मचारी तथा कामगार वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता संकेत खोकले, सुनील बिपटे ,कीष्णा डोळस आदींनी परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment