Ads

भद्रावती येथे भव्य मच्छी मार्केट उभारणार : नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे आश्वासन

भद्रावती: गेल्या अनेक वर्षापासून मत्स्य व्यवसायिकांच्या मच्छी मार्केटच्या जागेकरिता मच्छिंद्र मच्छूआ सहकारी संस्था मर्यादित भद्रावतीचा संघर्ष सुरू होता. यासंदर्भात संस्थेच्या वतीने नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना प्रत्यक्ष भेट देऊन मुख्याधिकारी यांचेकडे मागणीचे निवेदन दिले असता त्यांनी आपले मच्छी मार्केट मंजूर झाले असून त्वरित नियोजित जागेवर अद्यावत मच्छी मार्केटची उभारणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी गेलेल्या शिष्टमंडळास दिले.त्यामुळे संस्थेने केलेल्या मागणीला यश आल्याने मत्स्य व्यावसायिकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.A grand fish market will be set up at Bhadravati: Mayor Anil Dhanorkar's
भद्रावती शहरातील मच्छीमारांना व मच्छी विक्रेत्यांना मत्स्य विक्री करण्यासाठी उघड्यावर बसून मत्स्य विक्री करावी लागत होती. ही बाब मच्छिंद्र मच्छुआ सहकारी संस्थेने गेल्या अनेक वर्षापासून या मागणीला धरून नगरपालिका प्रशासन व वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता.विद्यमान कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब नगरपालिकेचे नगराध्यक्ष धानोरकर व मुख्याधिकारी वाघ यांच्या निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिली असता नगराध्यक्ष धानोरकर या समस्येबाबत अवगत केले. आपले मच्छी मार्केट मंजूर असून जागेची मंजुरी मिळताच लगेच नगर परिषदेद्वारे अद्यावत अशा मच्छी मार्केटची निर्मिती करून देण्यात येईल.असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. याबाबत मच्छिंद्र मच्छीमार सहकारी संस्था व भद्रावती येथील मच्छीमार बांधवांकडून नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे निर्णयाचे स्वागत करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र नागपुरे, अनंता मांढरे, मनोहर नागपुरे,सुनिल पारशिवे, रुपेश मांढरे, आशिष कार्लेकर,योगेश नागपुरे,आशिष नागपुरे व असंख्य समाजबांधव उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment