तालूका प्रतिनिधी जावेद शेख :
भद्रावती तालुक्यातील मौजा वीलोडा येथे राजे क्रीडा मंडळ वीलोडा च्या वतीने दिनांक ३ व ४ जानेवारी २०२३ रोजी ज्योतिबा विद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय भव्य पुरुषाच्या कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कला गुणांना वाव मिळावा त्याच्या अंगी असणारी कलेचे प्रदर्शन व्हावे या उद्देशाने राजे क्रीडा मंडळाच्या वतीने या कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले
Kabaddi match organized at Viloda
या कबड्डी सामन्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता श्री सुधीर भाऊ मुडेवार चंदनखेडा यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्ष श्री भानुदासजी गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. गिताताई मांनगुळधे सरपंच वीलोडा, श्री संतोष जी बागेसर पोलीस पाटील, रत्नाकर गायकवाड सामाजिक कार्यकर्ता, श्री. सुरेशभाऊ दाभेकर तंटा मुक्त समिती अध्यक्ष, श्री. सुधाकर जी बोथले, श्री. राहुल गायवाड सामाजिक कार्यकर्ता, श्री. विनोद शेंडे ग्रा. प. सदस्य, विद्याधर मेश्राम माजी वन समिती अध्यक्ष, श्री प्रनय खीरटकर सामाजिक कार्यकर्ता वरोरा, श्री. अनीलभाऊ चौधरी सामाजिक कार्यकर्ता, श्री. सत्रिभाऊ राव रिसोर्ट एडवेंचर, श्री राजू दडमल ग्रां. प. सदस्य, श्री चंद्रशेखर दोडके वन समिती अध्यक्ष, श्री. देठे सर मुख्याध्यापक ज्योतिबा विद्यालय, सौ. मलाताई गायकवाड ग्रा. प. सदस्य, सौ. रंजना ताई चौधरी ग्रा. प. सदस्य, सौ. वैशाली ताई जाभुळे ग्रा. प. सदस्य, हे होते. या कबड्डी सामन्याचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस श्री सुधीर भाऊ मुडेवार सामाजिक कार्यकर्ता यांनी दिले तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस श्री. भानुदास गायकवाड व श्री. अनिल चौधरी यांनी दिले तर तृतीय क्रमांककाचे बक्षीस श्री. राहुलभाऊ शर्मा व सात्रिभाऊ राव यांनी दिले या संपूर्ण कबड्डी सामन्यात येणाऱ्या खेळाडूंना भोजनाची व्यवस्था श्री. विद्याधर मेश्राम यांच्या कडून करण्यात आली.
0 comments:
Post a Comment