चंद्रपूर :महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर यांच्या वतीने उद्या 8 जानेवारी रोजी स्थानीय एन.डी. हॉटेलमध्ये जिल्हास्तरीय पत्रकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाची अध्यक्षता म.ग्रा.प. संघाचे प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे करणार आहेत. मुख्य अतिथी म्हणुन आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती राहणार आहे. या सोबतच जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली. राज्य सचिव राजेश डांगटे, अविनाश राठोड व राज्य प्रवक्ता अनंतराव गावंडे उपस्थित होणार आहेत .
A meeting of district level journalists was organized on January 8 on behalf of the Grameen Journalists Association
या मेळाव्यात जिल्ह्यातील पत्रकारांच्या पाल्यांचा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्या प्रसंगी सन्मान करण्यात येणार आहे. हा सन्मान ग्रामीण पत्रकारांच्या पाल्यांना एक प्रेरणा देणारा राहणार आहे.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म.ग्रा.प.संघ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन, जिल्हा कार्याध्यक्ष पी.एम.(कुक्कु) सहानी, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल देठे, जिल्हा सचिव विनोद पन्नासे, मार्गदर्शक धर्मेश निकोसे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश हांडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख धनराज कोवे यांनी केले आहे..

0 comments:
Post a Comment