मुंबई - चंद्रपुर जिल्ह्यातील अग्रगण्य डिजिटल पोर्टल news34 चा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे सन्मान करण्यात आला.
अप्रतिम मिडियातर्फे दरवर्षी राज्यातील विविध बिट मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान केला जातो.
6 जानेवारी 2023 पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिने अभिनेते व निर्माते मंगेश देसाई, विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, तसेच विशेष गौरवमूर्ती एमएस आरडीसीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक अभिजीत पाटील, निमंत्रक विवेक देशपांडे आदी उपस्थित होते.
पत्रकारांना पुरस्कार म्हणजे त्यांच्या निर्भीड कार्याच फळ आहे, अप्रतिम मीडियाचे हे आयोजन नेत्रदीपक असून आयोजक डॉ. अनिल फळे यांचं काम सुद्धा दखल घेण्यासारखे आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
मार्गदर्शन भाषणांनातर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपुरातील राजकीय व गुन्हेगारी क्षेत्रातील बातम्यांनी शासनाचे लक्ष वेधणारे News34 चे संपादक प्रकाश हांडे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील News34 हे पहिलं राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी News पोर्टल ठरलं हे विशेष.
कार्यक्रमाचे संयोजक विवेक देशपांडे,अप्रतिम मीडीयाचे संचालक अनिल फळे, सूत्रसंचालन श्रीमती शेटे यांनी केले.
News 34 चे संपादक प्रकाश हांडे यांचे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी कडुन अभिनंदन कार्य करण्यात आले.
0 comments:
Post a Comment