भद्रावती तालुका प्रतिनिधी:
सकाळी उठून आई आणि बापाचे चरण कमळ स्पर्श करा. तुम्हाला 33 कोटी देवांचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आईच ममतत्व आणि बापाचं बापत्व जाणा तुम्हाला जीवनात कशाचीही कमी पडणार नाही. जिवंत माणसाला चिंता जाळते पण मेलेल्या माणसाला चिता राहते. हे व्याख्यान स्वतः मधील परिवर्तनासाठी आहे. माणसाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आहे असे प्रतिपादन अमरावती येथील प्रख्यात वक्ते सोपान कनेरकर यांनी व्याख्यानमालेत केले.
Mother's compassion and father's fatherhood should be known-Lecturer Sopan Kanerkar
लोकसेवा मंडळाचे आद्य संस्थापक अध्यक्ष कै. निळकंठ राव गुंडावार यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्थानिक लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात 17 व्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या 71 व्या वर्षानिमित्त सदर आयोजन करण्यात आले होते.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना सोपान कनेरकर यांनी आपले विचार व्यक्त केले. माणूस माझे नाव या विषयावर ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव नामदेवराव कोल्हे, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, सहसचिव अमित गुंडावार , माजी सचिव मनोहरराव पारधे ,सदस्य गोपाल ठेंगणे, अविनाश पामपट्टीवार ,उमाकांत गुंडावार , संजय पारधे, प्राचार्य आशालता सोनटक्के उपस्थित होते.
माणूस म्हणून कसं जगाव ते सांगताना त्यांनी विविध उदाहरणे दिली. सुरुवातीला विविध उदाहरणांद्वारे प्रेक्षकांना हसवत ठेवले पण व्याख्यानाच्या उत्तरार्धात रसिक भाऊक झाले होते .आई बापाचं महत्व सांगताना रसिकांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
अध्यक्ष भाषणातून लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांनी सतरा वर्षांपासून चालू असलेल्या व्याख्यानमालेच्या सातत्याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन समीर उपलंचीवार ,प्रास्ताविक विजय गायकवाड तर आभार नामदेवराव कोल्हे यांनी मानले
0 comments:
Post a Comment